
संजय राठोड यांच्या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांना जमा होऊ देऊ नये, अशी नोटीस वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस स्टेशनने पोहरादेवी येथील बाबूसिंग महाराज यांना बजावली आहे.
वाशिम - पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्येनंतर नॉट रिचेबल होते. ते मंगळवार साडेअकरा वाजता पोहरादेवी येथे दर्शनासाठी येणार असल्याचे पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. वाशिम जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. यासंदर्भात काही नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांना जमा होऊ देऊ नये, अशी नोटीस वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस स्टेशनने पोहरादेवी येथील बाबूसिंग महाराज यांना बजावली आहे.