
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड हे उद्या वाशीम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे जाणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी वनमंत्री हे आज यवतमाळमधील आपल्या निवासस्थानी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड हे उद्या वाशीम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे जाणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी वनमंत्री हे आज यवतमाळमधील आपल्या निवासस्थानी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
पोहरादेवीला जाण्याची शक्यता
अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्याचबरोबर वाशीम जिल्ह्याची सीमा या दोन्ही जिल्ह्यांना लागून आहे. या तीनही जिल्ह्यांत मोठ्या संख्येने बंजारा समाज आहे. दरम्यान वनमंत्री संजय राठोड यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने बंजारा समाज पोहरादेवी येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दी न करण्याबाबत मानोरा पोलिसांनी पोहोरादेवीच्या विश्वस्त मंडळाला नोटीस बजावली आहे.